विमलताई तिडके विद्यालय,बेला येथे महिला दिन उत्साहात साजरा
विमलताई तिडके विद्यालय,बेला येथे महिला दिन उत्साहात साजरा
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, नागपूर / बेला : विमलताई तिडके विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक भिमसागर मून होते. यावेळी प्राचार्य राजेंद्र तिडके व शाळेचे सर्व शिक्षक प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पमाल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
हेही वाचा : जागतिक महिला दिनानिमित्त रायपूर येथे महिला आरोग्य तपासणी शिबिर
शाळेतील शालेय पोषण आहार शिजवून विद्यार्थ्यांना दररोज वाटप करणाऱ्या वनिता प्रभाकर तेलरांधे यांना शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. महिला दिनाच्या सर्व मुली व महिलांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. प्रा.रविकर गायकवाड यांनी प्रास्ताविक भाषण केले. सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थीनी नेहा विजय रोडे हिने केले.
हेही वाचा : चंद्रपूर शहरात एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या
नंदिनी सातघरे, हिमांशू उराडे, अंजली तेलरांधे, नैतिक मसराम,दिव्यांजली रोडे, गौरव उराडे,हर्षीका काळबांडे स्नेहा शेंदरे, उन्नती गैरकार,सुक्रूती गेडेकर या मुला मुलींनी महिला दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले.यशस्वीतेसाठी संदिप शहाणे, दिलीप ढबाले, प्रदिप बावणे, संदिप लांबट, प्रियांका वनकर, कविता झोडे व अनेक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. भावना शहाणे यांनी आभार मानले.
बातमी संकलन : दिनेश गोळघाटे, बेला
Post Comment
कोणत्याही टिप्पण्या नाहीत